संत गाडगेबाबा | Saint Gadge Baba
संत गाडगेबाबांनी अज्ञान, अंधश्रद्धा व अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यास प्राधान्य दिले.
संत गाडगेबाबा Saint Gadge Baba - जीवन परिचय
जन्म : २३ फेब्रुवारी १८७६
ठिकाण - शेणगाव (ता. सूर्जी, जि. अमरावती) येथे 'परीट' समाजात जन्म झाला.
पूर्ण नाव: डेबूजी झिंगरोजी जानोरकर
आईचे नाव : सखूबाई
बालपण
दापुरे (ता. मूर्तिजापूर) येथे आजोळी झाले.
• १८९२ साली बाबांचा विवाह झाला.
संत गाडगेबाबा Saint Gadge Baba संन्यास
दिनांक : १ (एक) फेब्रुवारी १९०५ (एकोणीसे पाच) रोजी संत गाडगेबाबांनी घराचा त्याग करून संन्यास स्वीकारला.
वेशभूषा
हातात खराटा व एक फुटके गाडगे अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे, असा त्यांचा वेश असे.
या मुळे त्यांना 'गाडगेबाबा' किंवा 'गोधडेबुवा' अशी नावे मिळाली.
अंधश्रद्धा निर्मूलन
कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन करत असे.बाबांनी विदर्भातील 'ऋणमोचन' येथून कीर्तनाद्वारे लोकशिक्षणाचे कार्य सुरू केले.
बाबांनी गावोगावी फिरून किर्तने केली व त्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, भोळ्या समजूती दूर करण्यास प्राधान्य दिले.
संत गाडगेबाबा यांचे गुरू
संत गाडगेबाबा संत तुकारामांना गुरुस्थानी मानत होते.
मी नाही कोणाचा गुरू ,नाही मला कोणी शिष्य ' असे संत गाडगेबाबा म्हणत असत.
'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' हे बाबांचे आवडते भजन..
धर्मशाळा, रुग्णालये, अत्रछत्रे यांची उभारणी
धर्मशाळा, रुग्णालये, अत्रछत्रे यांची उभारणी संत गाडगेबाबांनी नाशिक, देहू-आळंदी, पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी अनेक धर्मशाळा, रुग्णालये बांधली.
नदीवर घाट बांधले, अन्नछत्रे उघडली.
कुष्ठरुग्णांची सेवा केली.
१९०८ : पूर्णा नदीवर घाट बांधला.
• १९१७ : पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा बांधली.
८ फेब्रुवारी १९५२ : श्री गाडगेबाबा मिशन'ची स्थापना, यामार्फत राज्यभर शिक्षणसंस्था व धर्मशाळा स्थापन केल्या.
बाबांचा भोळ्या-भाबड्या जनतेला संदेश
बाबांचा भोळ्या-भाबड्या जनतेला संदेश : 'देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकारी कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्रे, देवदेवस्की, चमत्कार या गोष्टींवर विश्वास ठेवू नका."
गाडगेबाबांनी समाजास दशसूत्री संदेश दिला.
बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, 'बाबांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे आहे.' आचार्य अत्रे : सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात, तर गाडगेबाबांना पहावे कीर्तनात.
आचार्य अत्रे : 'महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ म्हणजे गाडगेबाबा." अमरावती विद्यापीठास गाडगेबाबांचे नाव देण्यात आले आहे.
चित्रपट : बाबांच्या जीवनावर 'देवकीनंदन गोपाल' चित्रपट. यातील 'गोपाला गोपाला' हे गाणे मन्ना डे यांनी गायले आहे.
निधन : २० डिसेंबर १९५६ रोजी वलगाव (जि. अमरावती) येथे पेढी नदीकाठी निधन.
स्वच्छता, शिक्षण व स्वावलंबन यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही - संत गाडगेबाबा