शहीद दिवस माहिती | sahid Diwas Mahiti

 शहीद दिवस | sahid Diwas

भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च शहीद दिवस sahid Diwas म्हणून साजरा केला जातो
“आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने 
क्रांती चा दीप प्रज्वलित करणारे 
भारतमातेचे सुपुत्र महान क्रांतिकारी भगतसिंग ,राजगुरू, सुखदेव  यांच्या 
शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन ”.
'वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद जय हिंद'

शहीद दिन माहिती


“नमन माझे त्या देशभक्तांना आलिंगन दिले ज्यांनी मृत्यूला स्वातंत्र्य मिळवून दिले देशाला कोटी कोटी वंदन त्या विरपुत्रांना”
भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च शहीद दिवस sahid Diwas म्हणून साजरा केला जातो.

23 मार्च ला शहीद दिन का साजरा करतात. 


23 मार्च रोजी ब्रिटिश सरकारने भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव भारत मातेच्या वीर जवानांना फाशी दिले होते त्यांच्या
बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा मिळाली त्यामुळेच आजचा दिवस 23 मार्च शहीद दिवस म्हणून साजरा केला.

शहीद दिन इतिहास


1928 मध्ये भारतामधील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडहून सायमन कमिशन नावाचे शिष्टमंडळ आले होते भारतात सर्वत्र या शिष्टमंडळाच्या काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला त्यावेळी लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता सायमन  परत जा सायमन गो बॅक अशा या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी आक्रमणात लालालचपतराय जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला तेच भक्तीने भारावलेले क्रांतिकार यांना हे सहन झाले नाही क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या लाहोर पोलीस ठाण्यातील इंग्रज अधिकारी सँडर्स  याला ठार मारण्याचे ठरवले त्याप्रमाणे लालाजींच्या पहिल्या मासिक श्राद्धाच्या दिवशी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही वेष पालटून पोलिस अधिकाऱ्यांच्या निवास्थानी गेले. सँडर्स दिसताच सुखदेव यांनी संकेत दिला भगतसिंग आणि राजगुरू यांनी एकाच वेळी गोळ्या झाडून त्यांचा बळी घेतला.
भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांविरुद्ध बंड करून ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन पी सँडर्स ची हत्या केल्याप्रकरणी व व ब्रिटिशांच्या दोन अन्य कार्य कायद्या च्या विरोधात होते क्रेशर दत्त व भगतसिंग यांनी दिल्लीच्या केंद्रीय विधान सभेत ब्रिटिशांच्या हुकूमशाही कृतीचा निषेध करण्यासाठी बॉम्ब टाकले . हत्या करणे व बॉम्ब टाकणे या आरोपींची शिक्षा म्हणून  23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली .या तरुण देशभक्तांचे फाशीनंतर तमाम भारतीयांच्या रक्तात आणखी पेटून उठला यांच्या बलिदानानंतर स्वातंत्र्याची चळवळ अधिक प्रकार झाली शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी 23 मार्च रोजी श्रद्धांजली वाहत हा दिवस शहीद दिवस म्हणून भारतीय साजरा करतात.

शहीद भगत सिंग यांची विचारसरणी


शहीद भगतसिंग यांनी आपल्या छोट्याशा आयुष्यात वैचारिक क्रांतीची ज्योत पेटवून भगतसिंग यांचे विचार आणि आज एक तरुण प्रभावित आहे भगतसिंग भगतसिंग यांची लढाई केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरतेच मर्यादित नव्हते तर ती सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी होती ब्रिटिशांच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्या बरोबरच समाजवादी रचनेवर आधारित समाज निर्माण करण्याचे भगतसिंग यांचे स्वप्न होते .

समाजवाद व्याख्या -  


सर्व माणसांच्या काही आवश्यक गरजा आहेत. सर्वांना अन्न ,वस्त्र, निवारा, शिक्षण ,आरोग्य आणि रोजगार या अत्यावश्यक गरजा भागवण्याची सोय म्हणजे समाजवाद अशी  भगतसिंग यांनी व्याख्या केली होती  

क्रांती म्हणजे काय ?


   क्रांती म्हणजे काय सांगताना भगतसिंग म्हणतात की  क्रांती म्हणजे  सध्या अस्तित्वात असणारे साम्राज्यवादी भांडवली समाजव्यवस्था संपूर्ण उलथून टाकून तिच्या जागीच समाजवादी व्यवस्था प्रस्थापित करणे.

भगत सिंग यांचे विचार


व्यक्तीला समजवून विचारांना संपवता येत नाही .

राखेचा प्रत्येक कण माझ्या ऊर्जेने गतिमान आहे मी एक असा वेडा आहे तो तुरुंगात ही स्वतंत्र आहे .

आपण ज्या ध्येया साठी झगडा देत आहोत त्याबद्दल स्पष्ट आकलन असणे आवश्यक आहे .








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.